भूम (प्रतिनिधी)- आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेधाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी, लोकसभेचे नवनियुक्त समन्वयक स्वप्निल कुंजीर पाटील व तसेच सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोनगिरी ता. भूम येथे शहरासह ग्रामीण भागातील शिवसेना युवासेना व महिला आघाडी आदींचा संघटनात्मक आढावा घेतला.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या सुरुवातीचे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोरोनाच्या महामारीतून सक्षमपणे महाराष्ट्र सांभाळून नागरिकांना आधार दिला असे अनेक कार्य सर्वसामान्य नागरिकापर्यंतत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर पाटील यांनी केले आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने यावेळी त्यांना प्रथम शिवसैनिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले. यावेळी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, विधानसभा समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवा सेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिनत सय्यद, तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे, प्रमुख उप तालुकाप्रमुख आब्दुल भाई सय्यद, रामभाऊ नाईकवाडी, श्रीमंत भडके, अविनाश गटकळ, अशोक वनवे, विभाग प्रमुख लहू गोरे, विनोद रेडे, रफिक तांबोळी, बाबुराव सपकाळ, संजय नायकिंदे, सोशल मीडिया मिनीनाथ नरके, जीवराज कुटे, ऋषी जाधवर, हर्षवर्धन जाधवर इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top