परंडा (प्रतिनिधी) - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव  गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परांडा तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे क्षमतावृध्दी प्रशिक्षण बावची विद्यालय परंडा यथे संपन्न झाले.

यामध्ये परांडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला खाजगी अनुदानित शाळा यामधील 50% शिक्षकांनी सहभाग नोंदविला उर्वरीत 50% शिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. सुलभक म्हणुन भाऊसाहेब सुर्यवंशी (माध्यमिक शिक्षक)जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा.शंकर अंकुश,( उच्च माध्यमिक शिक्षक) रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा, श्रीमती मनिषा जगताप, दिनकर  साबळे, अरविंद बाराते, बाळासाहेब डोके, सारिका हेगडकर.सर्व विषय साधन व्यक्ती गटशिक्षण कार्यालय परंडा यांनी काम केले यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, कृती संशोधन व नवोक्रम, 21 व्या शतकातील कौशल्य,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्य संपादणूक सर्वेक्षण, किशोरवयीन मुला मुलींना समजून घेताना,कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक, माहिती संप्रेशन तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, कौशल्यपूर्ण  वापर, व्यावसाय मार्गदर्शन व  समुपदेशन, नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण अंतरसमवाय. क्षेत्रे प्रभावी शैक्षणिक नेतृत्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण दरम्यान येथील शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान हाके यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील उर्वरित शिक्षकांचै. प्रशिक्षण दिनांक 27 ते  29 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.उर्वरित शिक्षकांनी दिनांक 27 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे.


 
Top