उमरगा (प्रतिनिधी)-केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या उमरगा येथील सकल मराठा समाजाने गुरुवारी (दि 15) नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आशोक चौकात सायंकाळी 6 च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.

जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणा दरम्यान जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी जरांगे-पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचे पडसाद उमरगा येथे उमटले असून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील आशोक चौकात सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळण्यात आला. यावेळी आण्णासाहेब पवार, बाळासाहेब माने, राऊबाई भोसले, रामभाऊ सुर्यवंशी, लक्ष्मण शिंदे, मंगेश भोसले, दिलीप जाधव, अजित सुर्यवंशी, रोहित पवार, प्रदिप पाटील, सुरज भोसले, बबन गायकवाड, गोपी शिदे राजू भोसले आदीसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. 


 
Top