परंडा प्रतिनिधी - ऊस वाहतूक करणारा आयशर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.ही दुर्घटना परंडा तालुक्यातील आवारपिंपरी शिवारात गुरुवार दि.15 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली अपघातग्रस्त हे दोन्ही सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथील रहिवासी आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदरचा टेम्पो परंडातालुक्यातुन तोडलेला ऊस घेऊन आयशर टेम्पो परंडा येथून मोहोळ तालुक्यातील अणगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याकडे जात असताना गुरुवार दि.15 दुपारी 4 वाजेच्या दरम्यान परंडा कुर्डूवाडी रस्त्यावर आवारपिंपरी शिवारात अपघात झाला. टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. या घटनेत टेम्पो चालक दशरथ चव्हाण (रा.वडवळ ता. मोहोळ ) व त्यांचा सहकारी शेट्टी हे दोन्ही गंभीर जखमी होऊन कॅबीन मधे अडकले असता जवळील आवारपिंपरी येथील बिरमल मोरे, पप्पू वेताळ. नानासाहेब पारेकर , बालाजी गुडे हनुमान जाधव, सागर गुडे, राजेश काळे आदी तरुणाने काचा फोडून आपघातातील दोघानाही बाहेर काढले असता त्यांना उपचारासाठी परंडा येथील रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील ऊपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान परंडा शहर व परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून आरटीओ विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.


 
Top