तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील येवती येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

येवती येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्ती मुक्ती प्रसंग, युद्धकांडातील अध्याय 43 ते 49 अशा सात अध्यायाचे वाचन व निरूपणास बुधवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला. तर गुरुवार दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सांगता करीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गाव परिसरातील वाचक सुचक ग्रामस्थ रामभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top