तुळजापूर (प्रतिनिधी)-माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तुळजापूरच्या वतीने आज दि.21 फेबुरवारी रोजी  आई तुळजाभवानीस महाअभिषेक पुजा  व महाआरती करण्यात आली.

गेली 19 वर्षापासून तुळजापूर शहरात ठाकूर यांचा वाढदिवसाच्या निमिताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम तुळजापूर शहर भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहर करत आहे. याही वर्षी गरजूवंत 101 महिलांना  साड्या वाटप करण्यात आल्या . तुळजाभवानी मंदिरासमोर आन्नदान करण्यात  आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंदभाऊ व्यव्हारे, भाजपा नेते नागेशजी नाईक, तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, शहरअध्यक्ष शांताराम नाना पेंदे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मलबा,तालुका उपाध्यक्ष विकास मलबा, बेटी बचाव बेटीचे जिल्हा संयोजक इंद्रजित साळुंखे, प्रसाद पानपुडे, बाळासाहेब भोसले, सागर पारडे, धैर्यशील दरेकर, ज्ञानेश्वर पांडागळे, मोर्डा गावाचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.


 
Top