धाराशिव (प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय  ढोकी या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी ढोकी पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार सातपुते  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संघर्ष ग्रुपचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांना पेढे देऊन सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. यानंतर संपर्क कार्यालयाला येऊन भेट दिल्याबद्दल सातपुते अण्णा यांचा सत्कार देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आला.


 
Top