धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिवमध्ये शिवजयंती महोत्सवाला चांगली परंपरा आहे. ही परंपरा पाहूनच शिवायन महानाट्य व शिव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. शिवजयंती महोत्सवासाठी भैरवनाथ उद्योग समुह काहीही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले.
धाराशिव शहरात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने 13, 14, 15 फेब्रुवारीपर्यंत शिवायन हे ऐतिहासिक महानाट्य धाराशिव शहरात आयोजित केले आहे. हे महानाट्य जि. प. कन्या प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. त्यानिमित्त मैदानाचे भूमीपूजन कार्यक्रम बुधवार दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी गेल्या 35 वर्षापासून मोठ्या उत्साहात धाराशिव शहरात शिवजयंती साजरी होत असते. त्याप्रमाणेच यंदापण साजरी होणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 45 फुट उंच किल्ला तयार करण्यात येणार असून, 15 फुट उंचीची श्री तुळजाभवानीची मुर्ती तयार करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांची पुजाआर्चा करण्यासाठी वाराणसीहून गंगा आरती करणारे पाच पुजारी बोलविण्यात आले आहेत. तर 18 तारखेच्यास पाळण्यासाठी प्रसिध्द कलाकार स्नेहलता वसईकर या येणार आहेत. माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे यांनी या शहरात सर्व जाती धर्माला सोबत घेवून शिवजयंती साजरी करण्याची परंपरा आम्ही चालू केली आहे. यापुढेही चालू राहिली. यावेळी दत्ता बंडगर, बाळासाहेब शिंदे यांचेही भाषण झाले.
यावेळी प्रकाश जगताप, माजी सभापती दत्ता साळुंके, देवकन्या गाडे, मनिषा केंद्रे, भारत कोकाटे, अंबादास दानवे, मैनोद्दिन पठाण, धनंजय राऊत, राजसिंहा राजेनिंबाळकर, सिध्दार्थ बनसोडे, विजय मुद्दे आदी उपस्थित होते.