धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा 79 वा वाढदिवस महाविद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्या सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय क्षात्र सेना यांच्यावतीने प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्मदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला . यावेळी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे मानून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे  उद्घाटन करून महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.जीवन पवार ,राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. केशव क्षीरसागर,कार्यालयीन कनिष्ठ लिपिक दत्तात्रय जावळे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या कार्यक्रमाला सुरुवात केली.

यावेळी अनेक गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी रक्तदान केले.याप्रसंगी ग्रंथालयाच्या वतीने प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञान शिदोरी दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी ग्रंथालयात भव्य मोठे पुस्तकांचे प्रदर्शन व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन ज्ञान शिदोरी दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख ग्रंथपाल मदनसिंग गोलवाल यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top