धाराशिव (प्रतिनिधी- सावित्रीबाई फुले याच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या असून त्यांचे विचार अंमलात आणले तर भारत महासत्ता बनू शकतो, असे प्रतिपादन कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केले.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या चळवळीला स्त्री-पुरुष समानतेचा नवा आशय प्राप्त करून दिला, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सावित्रीबाई फुले यांचे विचार गृहिणी, विद्यार्थिनी व समस्त महिला वर्गाने आचरणात आणावेत, असे प्रतिपादन केले. नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी यांनी शिक्षण आणि मानवतावादाच्या बाबत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा उहापोह केला. बालिका चौरे यांनी सावित्रीबाईच्या विचारातून प्रेरणा घेऊनच महिलांनी प्रगती केल्याचे सांगितले. सिरसकर सीमा यांनी सावित्रीबाई फुले याच खऱ्या अर्थाने सर्वांची आई असल्याचे सांगितले. तर कल्पना काशीद यांनी सावित्रीबाईंचे विचार अंमलात आणले तरच महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील, असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) धाराशिव संतोष भोर यांनी केले.


 
Top