धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ विभागातील प्रा.सौ. स्मिता पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. अलका इनामदार या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुप्रिया शेटे तर आभार डॉ. वैशाली बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. स्वाती बैनवाड यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. भाग्यश्री गोंदकर उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top