भूम (प्रतिनिधी)-ज्येष्ठ कवयित्री प्रा. अलका सपकाळ यांना मानाचा 2024 चा गदिमा साहित्य पुरस्कार वादळ झेलताना या साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. 

प्रा. सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक, कवयित्री असून कृतिशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी, कष्टकरी ,उपेक्षित वंचित महिला यांच्या वेदनांना शब्दरूप दिले आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे आयोजित 31 व्या राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सवात पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रा. फ.मु शिंदे, रामदास फुटाणे, हास्य कवी अशोक नायगावकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या निवडीबद्दल प्रा.सपकाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 
Top