भूम (प्रतिनिधी)-पंचायत समिती सभागृह  येथे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधनांचे वाटप करण्यात आले..

धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी दि.25 जानेवारी रोजी भूम तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे भूम तालुक्यातील दिव्यांग बांधवाचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. एडिआयपी योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी भूम येथील पंचायत समितीच्या प्राणगणात पात्र दिव्यांगांना विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

पात्र 260 लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविंद्र हायस्कूल भूम, तसेच प्रशांत भारती यांच्या स्कुल ला भेट दिली. डॉ. राहूल घुले आरोग्य मित्र परिवार कार्यालयास, माजी शहर प्रमुख दिपक मुळे कपड्याच्या दुकानास, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जिनत सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या. तसेच कोष्टी समाजाच्या चौडेश्वरी मदिरास भेट देऊन चार्चा केली. तसेच मांढरदेवी ची पुजा केली तसेच परांडा विधान सभा समन्वयक दिलिप शाळू यांची भेट घेऊन तब्येती बाबत चर्चा केली तसेच डॉ मोरे यांच्या हॉस्पिटलला भेट दिली. तसेच प्रतिक पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब क्षिरसागर यांच्या वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या

यावेळी धाराशिव खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मधुकर मोटे उपाध्यक्ष डिसीसी बँक, जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, उपजिल्हप्रमुख डॉ.चेतन बोराडे, संजय पाटील संचालक डीसीसी बँक, तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जिनत सय्यद, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडगळे, बुध्दीवान लटके ,शंकर जाधव,हनुमंत पाटोळे, प्रदीप डोके, रणदिवे महिला तालुका संघटक उमादेवी रणदिवे, युवासेना तालुका प्रमुख सुधीर ढगे, तात्यासाहेब गायकवाड, जयसिंग गोरे, शहरप्रमुख ॲड प्रकाश आकरे, युवासेना शहरप्रमुख अविनाश जाधव, उपतालुका प्रमूख लहू  गोरे,उमेश परदेशी,अशोक वणवे,रामभाऊ संभाजी नाईकनवरे, नाईकवाडी,बापूसाहेब कावळे उपस्थित होते.


 
Top