तुळजापूर (प्रतिनिधी)- अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झालेले श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा यांना अयोध्यातील न्यास ने महंतांचा सत्कार त्यांना दोन ब़ाक्स प्रसाद दिला. त्यात एक मंदीर संस्थानचा नावाने दिलेला प्रसाद श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे कडे सर्पद केला. त्यांना दिलेला प्रसाद बुधवार राञी श्रीतुळजाभवानी मातेच्या चरणी ठेवुन तो प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला.

आयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झालेले श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा हे बुधवारी तिर्थक्षेञी परतले. नंतर त्यांनी बुधवारी राञी रेवडी, लाडू केशर सह अनेक प्रसाद वस्तू तिळगुळ चांदी नाणे अक्षदा भाविकांना वाटप केले. भाविकांना प्रभुश्रीरामचंद्र यांचा प्रसाद श्रीतुळजाभवानी मंदीरात मिळाल्याने त्यांनी महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजी बुवाचे आभार मानले.


 
Top