धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील मानाचा गणपती, धाराशिवचा महाराजा श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेवरून मंदिरात अत्यंत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण  गेली चार दिवसा पासून केले होते. प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिकृती व रामाची प्रतिमा उभा करून दिवसभर सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत राममय वातावरणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.  सकाळी पूजाविधी व दुपारी 12 :20 यावेळी नुसार श्री ची पूजा विधि व राम पूजा विधि अत्यंत विधिपूर्वक  मंत्र उच्चारणे ,काशिनाथ दिवटे यांच्या गोड व मधुर अशा आवाजात भावपूर्ण वातावरणात आरती पूजा विधि करण्यात आली. यावेळी महिला व पुरुष मंडळींनी अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न केले. महिला मंडळाने आपले भजन सादर केले. सायंकाळी सात वाजता पूजाविधी, आरती, दीपोत्सव अत्यंत भावपूर्ण भक्ती पूर्ण वातावरणामध्ये संपन्न केले. 

महाप्रसादाचे आयोजन करून महिला बालक व लहानथोर सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा आस्वाद रात्री अकरा वाजेपर्यंत घेत गर्दी केली होती. आनंदोत्सवांमध्ये राम गीतेवर महिलांनी व बालकांनी एक ताल व एक सूर यावर नृत्य करण्यात आले .मंडळाच्या लहान मुला मुलींनी लेझीम खेळ खेळत रामाचा जयघोष ने निनादून गेले होते. मंडळाच्या महिला भगिनींनी रांगोळी हनुमान, राम ,लक्ष्मण  सीता अशा विविध चित्रीकरणातून रंगवली होती. दीप लावण्यामध्ये महिलांनी फार मोठा पुढाकार घेतलेला दिसून येत होता .सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ दिवटे, संजय पाळणे  दुर्गेश दिवटे  ,विश्वास दळवी, वरून साळुंखे  मनोज अंजीखाने , वैभव अंजीखाने सरपोतदार, खंडेलवाल बंधू, राजकुमार दिवटे, अतुल ढोकर, सचिन व रंजीत बुरुंग ,राहुल गवळी  सिद्धेश्वर जावळे ,सागर पाळणे, गणेश जगदाळे, दहीहंडी बंधू  बसवेश्वर पाळणे, सालपे बंधू, नंदकुमार हुच्चे विद्यानंद साखरे, आप्पा खरवरे,डॉक्टर अजित नायगावकर, मनमत आप्पा पाळणे, राम वंजारी  देशमाने बंधूं ,देवळे   आकाश महामुनी ,सच्चिदानंद पोतदार  उमाशंकर दिवटे, केदार उपाध्ये ,कुणाल दिवटे ,महिलाविभागातू सौ निर्मला उज्वला सुरेखा अनुराधा पुष्पा सौ उपाध्ये वैभवी साखरे सौ साखरे इत्यादी लहान थोर पदाधिकारी व गणेश भक्त गणेश दूत गणेश सेवक इत्यादी व सुवर्णकार सराफ असोसिएशन पदाधिकारी व सदस्य सोन्याचे व चांदीचे दागिने बनविणारे सर्व कुशल कारागीर इत्यादींनी परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन प्राध्यापक गजानन गवळी व भालचंद्र हुच्चे यांनी केले .मंडळांनी श्रीरामाच्या जयघोषात ,फटाक्याच्या आतिश बाजीत  मंडळाच्या वतीने आभार मानून, राम प्राणप्रतिष्ठा साजरी करण्यात आली. अनेक भाविकांनी लाडू, जिलेबी  पेढे ,पापड शिरा इत्यादीचा प्रसाद वाटप करून दरवर्षी राम दीपावली साजरी केली जाणार असा संकल्प भाविकांनी केला.


 
Top