धाराशिव (प्रतिनिधी)-आयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून धाराशिव येथील येथील एमआयडीसी भागातील गौरीनंदन गोशाळेच्या वतीने गोरक्षण आणि गोशाळेची अखंड सेवा करण्याचा संकल्प करण्यात आला. सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, समता नगर आणि गवळी गल्ली येथे यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीष करपे, उपाध्यक्ष मनोज अंजिरखाने यांनी गोवंशाचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत युवकांना शपथ दिली. हभप भारत महाराज कोकाटे, सौ. महानंदा सुरेश करपे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समता नगर येथील समता मध्यवर्ती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सोहळ्यात सकाळी गोरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी  गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीष करपे, उपाध्यक्ष मनोज अंजिरखाने, समता मध्यवर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप साळुंके, प्रशांत जैन, शिवाजी मोरे, मच्छिंद्र तुंजारे, किरण वैद्य, भैया बावीकर, माऊली पंडित, प्रथमेश दडपे, विनय वाझे, सुजित साळुंके, अमित साळुंके, कैलास पानसे, बालाजी करपे, सुरज तांबे, सतीश चव्हाण, शुभम साळुंके, गणेश सरडे, श्री. शेरकर आदीसह युवक उपस्थित होते.

गवळी गल्ली येथेही सायंकाळी गोरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास गौरीनंदन गोशाळेचे अध्यक्ष गिरीष करपे, उपाध्यक्ष मनोज अंजिरखाने, श्री बाल हनुमान गणेश मंडळाचे राम पाटील, भालचंद्र हुच्चे, युवराज हुच्चे, राहुल गवळी, योगीराज मोरे, प्रथमेश पेंढारकर, सचिन बुरुंग, गजानन गवळी, प्रमोद खंडेलवाल, आशिष कोचेटा, श्रीकांत दिवटे, विश्वास दळवी, प्रतीक साळुंके, आकाश खरवडे व गवळी गल्ली भागातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


 
Top