भूम (प्रतिनिधी)- येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

शहरातील प्रसिद्ध व्यापारी त्याचा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शाम होळकर यांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा परिधान आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर छोटी छोटी भाषणे केली. या भाषणातून त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा सुपेकर यांनी केले. तर आभार सरस्वती कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका दीपिका टकले यांच्यासह अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम केले.


 
Top