धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, राजकुमार माने, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे, प्रवीण पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरीक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top