धाराशिव (प्रतिनिधी)-जिजाऊ यांचा जन्म विदर्भात सिंदखेडराजा येथे झाला. लखोजी जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. जिजाऊंच्या जन्माच्या वेळेस लखोजी जाधवांनी हत्तीवरून साखर वाटली होती, त्याचप्रमाणे जिजाऊंनी सुद्धा वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शहाजी राजा बरोबर लग्न झाल्यानंतर जिजाऊ यांनी त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे स्वत:च्या मुलाला शिवबांना गनिमी काव्याचे शिक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य ज्योत प्रज्वलित केल़ी, असे प्रतिपादन मुख्याध्यापक पडवळ यांनी केल़े

शिंगोली आश्रम शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पडवळ खंडू रंगनाथ, प्रमुख पाहुणे राहुल नाईकवाडे सर, पर्यवेक्षक साहेब शेख अब्बास अली यांनी प्रतिमेचे पूजन केले.  यावेळी मुख्यापक पडवळ बोलत होत़े यावेळी राहुल नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून आदर्श भारत देशाचा नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रत्नाकर यांनी केल़े

कार्यक्रमासाठी सूर्यकांत बडदापुरे, जाधव चंद्रकांत, दीपक खबोले, प्रशांत राठोड, सचिन राठोड, विशाल राठोड, सुधीर कांबळे, सुरेखा कांबळे मॅडम, श्रद्धा सूर्यवंशी मॅडम, ज्योती साने मॅडम, वैशाली शितोळे मॅडम, कर्मचारी, गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, रेवा चव्हाण, अविनाश घोडके, मस्के मामा, आडे लिंगा मामा व याप्रसंगी कार्यक्रमाचे आभार सतीश कुंभार  यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top