परंडा (प्रतिनिधी) - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 जानेवारी 2024 रोजी दोन दिवशीय युज ऑफ चाट जीपीटी अँड एज्युकेशनल डिजिटल ईरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी  कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील प्राचार्य डॉफ रवींद्र कठारे, डॉ. अमेय पांगारकर आंतरराष्ट्रीय टी इ डी एक्स स्पीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव,आयक्युएसी समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, राष्ट्रीय कार्यशाळेचे मुख्य संयोजक ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख, महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख उपस्थित होते. 

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. कठारे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान अंगीकारून त्याचा देशहितासाठी अर्थातच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केला पाहिज .संशोधन हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती प्राध्यापकांनी निर्माण केली पाहिजे . प्रत्येकाने मधमाशी सारखे असले पाहिजे. चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत नवनवीन संकल्पना शिकण्याची जिद्द पाहिजे चाट जीपीटीच्या माध्यमातून कोणतीही माहिती प्राध्यापक घेऊ शकतात ती माहिती घेऊन विद्यार्थ्यापर्यंत सोप्या भाषेत कसे शिकवता येईल यासाठी प्रयत्न करावेत.

राष्ट्रीय राष्ट्रीयकार्यशाळेचे चार सत्रामध्ये मध्ये आयोजन करण्यात आले होते . पहिल्या सत्रामध्ये नाव नोंदणी उद्घाटन समारंभ व डॉ. अमेय पांगारकर इंटरनॅशनल टी ई डी एक्स स्पीकर यांचे डिस्कवर द फ्युचर ऑफ चार्ट जीपीटी अँड ए आय टेक्नॉलॉजी या नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान सादर करण्यात आले . तर दुसऱ्या सत्रामध्ये चाट जीपीटी अँड टेक्नॉलॉजी या विषयावरती डॉ. अमेय पांगारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . 

दिनांक 20 जानेवारी रोजी राष्ट्रीय कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये प्रा भूषण कुलकर्णी प्रो ट्रेनर आणि श्री एकनाथ कोरे ऍडमिनिस्ट्रेटर नॉलेज ब्रिज फाउंडेशन अहमदनगर यांनी युज ऑफ ए आय अँड टेक्नॉलॉजी फोर इफेक्ट क्लासरूम टीचिंग या विषयावरती प्रात्यक्षिकासह आपले मनोगत व्यक्त केले . तर चौथ्या सत्रामध्ये मध्ये ए आय अँड टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टिव क्लासरूम या विषयावरती प्रा भूषण कुलकर्णी आणि  एकनाथ कोरे यांनी विविध सॉफ्टवेअर असलेल्या संदर्भात प्राध्यापकांच्या माध्यमातून त्यांना चर्चासत्रात सहभागी करून आपले व्याख्यान सादर केले. यावेळी शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव या विद्यापीठाचे संचालक डॉ प्रशांत दीक्षित व डॉ. जे. एक. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने. च्ा. भूषण कुलकर्णी कार्यशाळेचे संयोजक डॉ. राहुल देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ प्रशांत दीक्षित यांनी महाविद्यालयाच्या चढत्या आलेकाचे भरभरून कौतुक केले. मराठवाड्यामधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाने केलेल्या विकासामध्ये प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी  सांगितले की, महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे की प्राध्यापकांनी या नवीन संकल्पना समजून घ्याव्यात व त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना उपयोगात आणाव्यात. महाविद्यालयाचे प्राध्यापक या नवीन सॉफ्टवेअरचा नक्कीच उपयोग करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. दिनांक 19 व 20 या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या चारही सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर चारही सत्राचे आभार डॉ. विद्याधर नलवडे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन चव्हाण यांनी दिला. या चर्चासत्रामध्ये देशभरातून जवळजवळ 85 ते 90 विद्यार्थी संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला होता. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये चौथ्या समारोप समारंभाच्या प्रसंगी डॉ. राजश्री तावरे, डॉ. एस. एन जाधवर, प्रा.तानाजी फरतडे, प्रा. गुरुदेव गुरुलिंग यांनी आपली मनोगत व्यक्त केली. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. टेक्निकल सपोर्टर म्हणून डॉ. संतोष काळे व प्रा. राजुरे आर के.यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय  चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक.शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत सहकार्य केले.


 
Top