भूम (प्रतिनिधी)- भूम येथे शंकरराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. चंदनशिव यांनी केली. 
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एन. डी पडवळ, प्रा. एन. आर.जगदाळे, प्रा. दीप्ती गिरी, व सर्व प्राध्यापक,कर्मचारी श्रीमान रामभाई शहा रक्तकेंद्र बार्शी येथील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एकूण 31 रक्तदात्यांनी रक्त दान केले. त्यामध्ये महाविद्यालयातील प्रा. विद्यार्थी, कर्मचारी यांचा सहभाग होता. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. टी. आर. बोराडे. प्रा. एस. एम. माळी. प्रा. खराटे मंगेश. प्रा. राहुल राठोड. प्रा. जयेश मसराम, प्रा गोपाल खंदारे, प्रा. एल. बी. पवार, प्रा. नवनाथ भोंग, प्रा. आर. एस. गायकवाड, प्रा. डोंगरदिवे अक्षय आदीसह सर्व प्राध्यापकानी प्रयत्न केले.

 
Top