धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राजाभाऊ राऊत, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जगातले सर्वोत्तम नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली येणारी निवडणूक ही पूर्ण ताकतीने लढवण्यासाठी सुपर वॉरियर्स यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यासाठी प्रत्येक सुपर वॉरियर्स कडून येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर किमान 51% मते मिळाली पाहिजेत. राज्यात 32 हजार 33 सुपर वॉरियर्स असून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव पहिल्या स्थानावर आहे. जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकसभा मतदार संघातील 800 सुपर वॉरियर्स यांना 13 महिने 3 तास पक्षाच्या कामासाठी वेळ द्यावा लागणार आहे. 2024 ते 2029 हे वर्ष नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात्तम भारत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर संकल्पनेमुळे देशात प्रगती होत असून येणाऱ्या काळात वाहनांना पेट्रोल डिझेलची गरज भासणार नाही असे प्रदेश अध्यक्ष म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदे तज्ञ असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी अहोरात्र काम करून कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी येऊन मराठा आरक्षण घालवले. विशेष उल्लेख करत आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा विधानसभेच्या पहिल्या 25 आमदाराच्या यादीत उत्कृष्ट काम करणारे आमदार म्हणून नाव घेतल जाते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

प्रास्ताविक भाषण करताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की धाराशिव लोकसभा मतदार संघात आपण योग्य पध्दतीने बांधणी करत आहोत. यात आपलं सरकार आल्यामुळे प्रचंड फरक पडला आहे. उध्या आपला हक्काचा खासदार केंद्रात असेल तर आणखी वेगाने करू. आपला आग्रह हा आहे की,धारशिवच्या लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी. पण पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असून पूर्ण ताकतीने ही जागा निवडून आणू असा विश्वास त्यांनी दाखवला.

बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले की, पक्षाने बार्शी मतदार संघासाठी भरभरून निधी दिला, तर आता लोकसभेसाठी जो उमेदवार असेल त्याला निवडून आण्याची जबाबदारी आमची असेल. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संताजी चालुक्य यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

सदरील कर्यक्रमासास प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस  किरण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य- पाटील, माजी जिल्हाध्य नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.मिलिंद पाटील, सुधीर पाटील, अनिल काळे, अस्मिता कांबळे, खंडेराव चौरे, व्यंकट गुंड, विनोद गपाट, मकरंद पाटील, झहीर चौधरी, सतीश देशमुख, गुलचंद व्यवहारे, प्रवीण पाठक, अविनाश कोळी, युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे तसेच  प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top