सोलापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या सोलापूर स्थानकावर “स्टेशन महोत्सव” कार्यक्रम पार पाडण्यात आला. मंडळावर अशा प्रकारचा महोत्सव प्रथमच आयोजित करण्यात आला होता. येणाऱ्या पिढ्यांना स्थानकांचे ऐतिहासिक संदर्भ कळावेत हा स्टेशन महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. स्टेशन महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना स्थानकांच्या इतिहासाची जाणीव करून देणे. रेल्वे स्थानकांच्या स्थापनेशी संबंधित या विविध उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकांचे रेल्वे स्थानकांशी असलेले नाते दाखवून देणे हा आहे.
ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्धघाटक सोलापूर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, सोलापूरचे आमदार श्री. सुभाष बापू देशमुख आणि आमदार सुश्री. प्रणितीताई शिंदे उपस्थितीत पार पडला .
या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या विभागावर प्रकाश टाकला ते म्हणाले , “रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथमच स्टेशन महोत्सव सुरू होत आहे.हा उत्सव सोलापूर विभागात आज आणि पुढील आठवड्यात पंढरपूर रेल्वे स्थानकावर साजरा केला जाणार आहे.
स्टेशन महोत्सव साजरा करण्याचा उद्देश त्या स्थानकाची ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक महत्त्व, परंपरा याविषयीची माहिती बहुतेक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. सोलापूर रेल्वे स्थानक 163 वर्षे जुने असूनही आधुनिक बदलांसह पुढे जात आहे. सोलापूर हे मध्य आणि दक्षिण पश्चिम विभागांना जोडणारे सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.सोलापूर रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या 'अ वन श्रेणी' मध्ये येते.
या फेब्रुवारी 2023 मध्ये सोलापूर विभागाच्या 100 टक्के पूर्ण दुहेरीकरण यासोबतच विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, रेल्वे स्थानकांचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यामुळे डिझेलचा वापर कमी झाला आहे आणि यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास ही हातभार लागला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर विशेषतः प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. केंद्र सरकारने 2020 मध्ये केलेल्या घोषणेनुसार, सोलापूर रेल्वे स्थानकाचे नाव भारतातील सर्वात महत्त्वाच्या आणि स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. अशा अनेक विषयावर प्रकाश टाकला.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्री. एल. के. रणयेवले आणि वरिष्ठ संरक्षा अधिकारी श्री. शिवाजी कदम तथा अन्य अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी, सोलापूर वाशी कार्यक्रमाला उपस्थित होते. स्टेशन महोत्सव कार्यक्रमात सोलापूर विभागाने जतन केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सोलापुरातील वैशिष्ट्यपुर्ण वस्तू विक्रीसाठी स्टॉल, आणि डॉ. हेडगेवार रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्देमाणे रक्तदान शिबिर आयोजित केले. प्रदर्शनीत सोलापूरचे प्रसिद्ध चादरीचे स्टॉल, वन्यजीव औषधाचे स्टॉल, हाताने तयार केलेले कापडावरचे फोटो आणि लोक कलेतून सादर करण्यात आलेला गोंधळ सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच शाळकरी मुलांचे स्टेशन विकास, विकसनशील रेल्वे या विषयावर झालेली निबंध स्पर्धा, भाषण आणि ड्रॉईंग मध्ये प्राविण्य विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले गेलेआणि “स्टेशन महोत्सव” कार्क्रमाची सांगता राष्ट्रगानने झाली.