धाराशिव (प्रतिनिधी)- चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची प्रतिमा प्रेरिम होते असे मत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.

शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये नुकत्याच  राष्ट्रीय नवनीत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. विभागीय पातळीवर पुढील प्रमाणे इ. 7 वी विभागाच्या 192 विद्यार्थ्यांपैकी 6 विधार्थ्यांची निवड झाली असून अनुक्रमे कु. संस्कृती लिंबाजी यमगर, आदिती महादेव भद्रे, आयशा इलाई बेग,चि. अविष्कार सचिन हुलसुरकर ,कु. मोसमी लियाकत शेख, सलोनी साहेबराव गांगुर्डे यांची निवड झाली असून या विद्यार्थ्यांना नवनीत च्या वतीने चित्रकला साहित्याचे वाटप आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आले.

त्याचबरोबर प्रशालेचे प्रमाणपत्र पर्यवेक्षक आर.बी.जाधव व कलाध्यापक एस.डी. वाघ यांनी स्वीकारले. या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ. प्रेमाताई पाटील म्हणाल्या, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांच्या प्रतिभेस प्रेरणा मिळते. आयोजक चित्रकला स्पर्धा घेणाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या बक्षीस समारंभ प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एस. देशमुख इ. 7 वी विभागाच्या शिक्षिका सौ.जे.बी.मस्के, सौ.डी.एल. कांबळे शिक्षक एस.एन. धोंगडे, डी.एस.शिराळ, बी.टी.गवळी आदि शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले.


 
Top