नळदुर्ग (प्रतिनिधी)- धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे केलेले स्वच्छतेचे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे असे श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी म्हटले आहे.
धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी दि.9 डिसेंबर रोजी नळदुर्ग येथील श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्रमदान करून श्रीक्षेत्र रामतीर्थचा परीसर अतीशय चांगल्या प्रकारे स्वच्छ करून मंदीर परीसर चकाचक केला. मंदीर परीसरात साचलेला कचरा तसेच लाकुड फाटा बाजुला करून मंदीर परीसर स्वच्छ केला आहे. या सदस्यांमध्ये अधिकारी, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. हातात खराटा, फावडा व टोपले घेऊन स्वच्छतेचे काम करीत असताना त्यांनी लाज न बाळगता स्वच्छतेचे काम केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांमध्ये जि. प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, विकास गाडेकर,नंदु तांभाडे, शेखर आमले, अजिंक्यराजे निंबाळकर, युवराज देशमुख, संजय शिंदे, प्रसाद वैकुंटे, जयप्रकाश कोलगे यांचा समावेश होता.
धाराशिव येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे केलेले स्वच्छतेचे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे. इतरांनीही यांचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवुन आपला परीसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे असे श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी बसवराज पाटील महाराज, श्री शुक्ला महाराज आदीजन उपस्थित होते.