धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना नामदेवराव (बापू) बंडोजी भालशंकर गौरव समिती सोलापूर, मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर आणि सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार त्यांनी आजतागायत शिक्षक, प्राचार्य शिक्षण संस्थाचालक म्हणून विविध पदाचा उपयोग महाराष्ट्र आणि उभ्या भारतातील विद्यार्थी आणि समाजसेवेसाठी केलेला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांना अभिप्रेत असलेले आणि राज्य, देश घडणारे शिक्षण सातत्याने देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, मराठवाडा विभागप्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी स्वीकारला.

प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी याप्रसंगी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वतीने गौरव समितीचे आभार मानले.याप्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कवी डॉ. अरविंद हंगरगेकर, लेखक डॉ. मच्छिंद्र नागरे व अनेक गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top