धाराशिव (प्रतिनिधी) - मनुस्मृती दिन व स्त्री मुक्ती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने जिल्हाध्यक्षा विजयमाला सुरेश धावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आधुनिक मनुस्मृति असलेल्या ईव्हीएम मशीनचे दि.25 डिसेंबर रोजी दहन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दि.25 डिसेंबर 1927 रोजी दहन केले. त्या मनुस्मृती दिनाचे औचित्य साधून धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आधुनिक मनुस्मृती असलेल्या ईव्हीएम मशीनचे दहन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या उपाध्यक्षा शिलाताई चंदनशिव, जिल्हा संघटक विद्यानंद वाघमारे, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विश्वास पांडागळे, तालुका पर्यटन सचिव धनंजय वाघमारे, तालुका संघटक शशिकांत माने, अतुल लष्करे, युवराज पौळ, आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष विद्यानंद बनसोडे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड, मुकेश मोटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, बाबासाहेब कांबळे, संरक्षण दलाचे तालुका उपाध्यक्ष स्वराज जानराव, सरचिटणीस उमाजी गायकवाड, भीमसेन माने, हिम्मत शिंगाडे, सोहन बनसोडे, दिपक बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय बनसोडे यांनी तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी मानले. यावेळी परिवर्तनवादी नागरिकांसह आंबेडकरी विचारांच्या विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top