तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शांकभरी नवराञ महोत्सव पुर्वतयारी बैठक बुधवार दि.21 डिसेंबर रोजी श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाँ. सचिन ओम्बासे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली.                      .

या बैठकीत श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ महोत्सव गुरुवार दि18पासुन आरंभ असुन तत्पुर्वी  गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी शांकभरी नवराञ उत्सव पुर्वीची मंचकि निद्रा आरंभ होणार आहे. या महोत्सवतील धार्मिक कार्यक्रम पञिका आज बैठकीत सादर केली गेली. यात शांकभरी नवराञ उत्सवातील सर्व धार्मिक विधी पुर्व पार परंपरेने करण्याचे ठरले तसेच यंदा शांकभरी नवराञ उत्सवात श्रीतुळजाभवानी सांस्कृतिक कला क्रिडा महोत्सव छोट्या स्वरुपात“ स्थानिक कलाकरांचा माध्यमातून  आरंभ करण्यावर चर्चा होवुन यास जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शांकभरी नवराञउत्सव काळात मंदीर पहाटे ऐक वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनार्थ खुले होणार. यंदा शांकभरी नवराञउत्सव यजमान पदाचा मान भोपे पुजारी मंडळाकडे रोटेशन पध्दतीने देण्यात आले. शांकभरी नवराञ उत्सव काळात स्थानिकांच्या 56 सिंहासन महाअभिषेक महापुजा केल्या जाणार आहेत. या काळात भाविकांच्या सिंहासन पुजा असणार नाहीत. तसेच सकाळी पाच संध्याकाळी दोन अशा सिंहासन पुजा असणार आहेत. यात महंत तिन्ही पुजारी मंडळ  व मुख्य यजमान यांच्या असणार आहेत. या बैठकीस महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, विश्वस्त तहसिलदार अरविंद बोळंगे, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, ओकांर काटकर सह तिन्ही पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top