धाराशिव (प्रतिनिधी)-शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या संघटनेची पदाधिकारी निवड बैठक स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक धाराशिव येथे पार पडली.आजच्या बैठकीमध्ये धाराशिव तालुका कार्यकारिणी, धाराशिव तालुका विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख अशा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री अमोल सिरसट उपाध्यक्ष श्री व्यंकट कोळी सचिव श्री दत्तात्रय जावळे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर काटे सह कार्याध्यक्ष श्री बबलू उमाटे संघटक श्री महेश देशमुख सह संघटक श्री ऋषिकेश गुंड कोषाध्यक्ष श्री अविनाश रोहिले सह कोषाध्यक्ष श्री आनंद हाजगुडे प्रवक्ता श्री राजेश अंबड सहप्रवक्ता श्री बालाजी पवार प्रसिद्धीप्रमुख श्री सचिन गायकवाड सहप्रसिद्धीप्रमुख श्री अजय चौरे सोशल मीडिया प्रमुख श्री नितीन भोंग सोशल मीडिया श्री बालाजी पवार कायदेशीर सल्लागार अड. श्री अमोल डोंगरे यांची सर्वानुमते समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे यांनी निवड करण्यात आली.

धाराशिव तालुक्यातील एकूण 13 विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली. यामध्ये तेर विभागप्रमुख म्हणून सुदर्शन बुकन तर उपविभाग प्रमुख म्हणून अजिंक्य वराळे व बालाजी थोडसरे यांची नियुक्ती. ढोकी विभागप्रमुख म्हणून गणेश पवार उपविभाग प्रमुख म्हणून वैभव घुटे व योगेश होगले यांची नियुक्ती खेड विभाग प्रमुख म्हणून श्री व्यंकट कोळी उपविभाग प्रमुख म्हणून विशाल पाटील व विशाल गाढवे यांची नियुक्ती. येडशी विभाग प्रमुख म्हणून सागर येडवे तर उपविभाग प्रमुख म्हणून खंडू माने व अविनाश मचाले यांचे नियुक्ती करण्यात आली. कौडगाव विभागप्रमुख म्हणून श्री अच्युत थोरात मेजर यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून रमेश बचुटे व सौदागर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. भातंबरे विभाग प्रमुख म्हणून सौदागर पवार यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून अक्षय जाधव व किशोर मते यांची नियुक्ती करण्यात आली. पोहनेर विभाग प्रमुख म्हणून श्री सुनील मिसाळ यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून श्री अक्षय कापसे व ज्ञानेश्वर नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली. रुईभर विभाग प्रमुख म्हणून श्री मनोज शेलार यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून बबलू भोईटे व अजय बोंदर यांची नियुक्ती करण्यात आली.

बामणी विभाग प्रमुख म्हणून श्री कंचेश्वर डोंगरे यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून युवराज परतापुरे व ओमकार शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली. सारोळा विभाग प्रमुख म्हणून काशिनाथ आगळे यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून आकाश हाजगुडे व संदीप रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली. चिखली विभाग प्रमुख म्हणून श्री विकास जाधव यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून आशिष क्षीरसागर व विनोद चोबे यांची निवड करण्यात आली. समुद्रवाणी विभाग प्रमुख म्हणून श्री हनुमंत कदम यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून सागर कदम व रणजीत पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली. पाडोळी विभागप्रमुख म्हणून श्री रवींद्र मोरे यांची तर उपविभाग प्रमुख म्हणून सुरज इंगळे व प्रशांत नांदे यांचे नियुक्ती करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकारी यांचे समितीचे अध्यक्ष श्री जयराज खोचरे उपाध्यक्ष श्री गौरव बागल सचिव श्री आकाश कोकाटे कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे संघटक हनुमंत यादव कायदेशीर सल्लागार धैर्यशील सस्ते समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत खुने धर्मराज सूर्यवंशी गुंडोपंत जोशी धनंजय साळुंके दत्ता साळुंके संजय शिंदे संजय डोंगरे यांनी अभिनंदन केले. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत जिजाऊ चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोषात नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. पदाधिकारी निवड बैठकीचे प्रस्ताविक जयराज खोचरे यांनी केले सूत्रसंचालन सिद्धेश्वर मते यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री देवानंद सुरवसे यांनी केले. यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top