पुणे (प्रतिनिधी)-हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेहण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव (ता. खेड, जिल्हा- पुणे) हे मूळ गाव. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला हा भव्य भुईकोट किल्ला उभारला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) ज्यांची तुलना ़फ्रान्सच्या नेपोलियनशी होते. यांचा जन्म याच किल्ल्यामध्ये 3 डिसेंबर 1776 रोजी झाला.

या किल्ल्याला 7 भव्य दगडी बुरुज असून मुख्य किल्ल्या मध्ये भव्य प्रवेश द्वार, राणी महाल, विंष्णु पंचायतन, बुरुजातील विहीर, राजसदर, पश्चिम द्वार, भूमिगत खलबतखाने, होळकर कालीन तोफा अश्या अनेक सुंदर वास्तू आज ही होळकरशाही ची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत. सध्या किल्ल््यामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे.

किल्ल््याचे जतन संवर्धन व्हावे, ही लोक भावना आहे. यामुळे वाफगाव व परिसराचा विकास होईल, येणाऱ्या पिढ्याना तो प्रेरणा देत राहावा या साठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे अनेक वर्षां पासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तू विशारद असून किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या टीमने तयार केला आहे.

राजेंच्या या प्रयत्नाला यश येत त्यांच्या विनंती मुळे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजीत पवार यांनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता संवर्धन कार्यासाठी पहिल्या टप्प्या मध्ये 7.20 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्याचे टेंडर ही निघाले आहे. यामुळे वाफगाव किल्ल््याच्या संवर्धनाचा मार्ग आता मोकळा आहे. येत्या 06 जानेवारी ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेकदिन किल्ले वाफगाव येथे परंपरे प्रमाणे साजरा होणार आहे. तेव्हा पासून संवर्धन कामाला सुरवात होणार असल्याचे राजेंनी सांगितले. 

शरद पवार व अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या रयतच्या मीटिंगमध्ये रयत ने ही संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे. किल्ल््यामधील शाळाही लवकर स्थलांतरीत करण्यासाठी प्रयात्न चालू आहेत. पण तो पर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरवात करण्यात येणार आहे असे राजे म्हणाले.

किल्याचे ऐतिहासिक महत्व व जण भावना लक्षात घेऊन ना. अजित पवार यांनी या कार्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेंनी त्यांचे आभार मानले. या कार्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मा मंत्री हसन मुश्रीफ, खेडचे आमदार दिलीप मोहिते, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाने, वाफगाव ग्रामस्थ व सर्व होळकर प्रेमींचे, लोक प्रतिनिधी यांचे राजेंनी आभार मानले व अभिनंदन केले.


 
Top