धाराशिव (प्रतिनिधी)-सर्व समाज बांधवांनी लग्नतिथी असल्याने विनंती केली.त्यामुळे 21 ऐवजी 22 तारखेला बैठक आयोजित केली आहे.

ओबीसी भटके विमुक्त समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी मधील मागच्या दाराने नियमबाह्य होणारी घुसखोरी रोखण्यासाठी. संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकचळवळ व आंदोलने सुरू झालेली आहेत. विविध ठिकाणी एल्गार सभा होत आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव येथे दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे सकल ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने सभेच्या नियोजनासाठी व सर्वां सोबत चर्चा करण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हातील सर्व ओबीसी, व्हिजेन्टी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन सकल ओबीसी एसी, एनटी, एसटी, व्हिजेन्टी धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top