धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉज वर पोलिसांचे छापासत्र सुरू आहे. आरोपी धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय 42 वर्षे, व्यवसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा जि. धाराशिव, रविंद्र महादेव महतो, वय 35 वर्षे, व्यवसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा. कमरवली थाना पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता. उमरगा जि. धाराशिव, आशा रामचंद्र तेलंग (लॉज मालक) रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव. यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.30 डिसेंबर रोजी 17.00 वाजण्याच्या सुमारास आरोग्य नगरी उमरगा येथील शांतादुर्गा लॉज येथे एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय दिला. तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलिसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 370,370(अ)(2),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत उमरगा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. 
Top