धाराशिव (प्रतिनिधी)-लोकशाहिचे मंदिर संसद भवनात तृणमूल कॉग्रेसचे खासदार कल्याण बॉनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा. जगदीप धनखड यांच्या (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनिय वर्तन करीत होते. आणि स्वत:ला शहाणे म्हणवणारे संविधनाचा अवमान करणारे राहुल गांधी हे निर्लज्यपणे त्या घटनेचे चित्रण करीत होते.

या घमंडी नकलाकार आघाडीचा आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व भाजपा व सर्व मोर्चा व आघाडीच्या वतीने तीव्र निषेध केला या नौटंकी काँग्रेस ,तृणमूल काँग्रेस व आघाडीचा प्रतिमात्मक पुतळयाला जोडे मारुण आंदोलन करण्यात आले ,या वेळी लोकसभा निवडणूक संयोजक नितीन काळे, प्रदेश का. सदस्य, खंडेराव चौरे, प्रविण पाठक, जिल्हा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, भा.ज. प युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुनिल काकडे, डॉ गोविंद कोकाटे, सिद्धोजीराजे निंबाळकर, दाजी अप्पा पवार, बापू पवार, शेषेराव उंबरे, वैभव हंचाटे, संग्राम बनसोडे, गणेश मोरे, सुनिल पंगुडवाले, किशोर पवार, सलमान शेख ,शंकर मोरे, प्रसाद मुंडे, व्यंकट कोळी, अमोल पेठे, गणेश इंगळगी, अजय सापकाळ, धनराज नवले, ओंकार  देवकते, सार्थक पाटील, नवनाथ सोलनकर, अनिरुध्द जवळेकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top