धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे - पाटील यांचे अमरण उपोषण आठव्या दिवशीही सुरुच आहे. शासन मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. शासनास साडी,चोळी, बांगड्या पाठवून शासनाच्या या कृतीचा वडगाव (सि.) येथे मराठा आंदोलकाच्या वतीने निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे - पाटील यांचे अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साखळी उपोषण सुरु आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सरसकट मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे - पाटील हे अंतरवली, सराटी येथे 25 ऑक्टोबर पासून अमरण उपोषणास बसले आहेत. सरकार मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. मनोज जरांगे - पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारच्या वेळकाढूचा निषेध करण्यासाठी आंदोलकाच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठ्याकडे साडी, चोळी, बांगड्या देवून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मरोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. तत्पुर्वी रात्री गडगाव (सि.) मध्ये वँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या कॅडल मार्चमध्ये महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गावरुन हा कॅडल मार्च काढण्यात आला.