धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, वाशी,लोहारा  हे तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मात्र उर्वरित पाच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना ई-मेल द्वारे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील भूम,परांडा,कळंब, तुळजापूर व उमरगा या पाच तालुक्यांमध्ये देखील परिस्थिती गंभीर असून पाणी व चारा टंचाई जाणवत आहे.शासनाने दुष्काळ जाहीर न केल्यास या तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.त्यासोबतच जनावरांना देखील पिण्याचे पाणी व चारा या समस्या देखील भेडसावू शकतात. या तालुक्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे हे पाच तालुके देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.


 
Top