भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील हाडोंग्री येथील निसर्गरम्य  ध्यान केंद्र या ठिकाणी आयुर्वेद हॉस्पिटल प्रणवजस्‌‍ आयुर्वेदिक वेलनेस मेडिसिन सेंटरचे उद्घाटन दि. 18 नोव्हेंबर रोजी हिमालय या ठिकाणी ज्ञान साधना केलेले केशव महाराज यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी हॉस्पिल मधील डॉक्टरांनी हॉस्पिटल मधील अध्यवत असलेले पंचकर्म, विशेष कर्म, आयुर्वेदिक उपचार व ध्यान केंद्र, आयुर्वेदिक औषध व आयुर्वेदा बद्दल अधिक माहिती दिली. दरम्यान आजार नेमका कधीपासून सुरू झाला. त्यावेळी काय लक्षणं होती, हे जाणून घेतल्यानंतर थेट त्यांवर उपचार केले जातात. म्हणूनच तो मुळापासून बरा होण्यास मदत मिळते. 

अर्थातच एखादा आजार बरा करण्यासाठी डॉक्टर जेवढी मेहनत घेतात, तेवढाच रुग्णांकडूनही उपचाराला चांगला प्रतिसाद मिळणं आवश्यक असतं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे घेतल्यास त्यांचा लवकर परिणाम होतो आणि आजारपण मुळापासून संपुष्टात येतं असे डॉक्टरांनी बोलताना सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अमेय पाटिल, आदित्य पाटिल, पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top