धाराशिव (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त एक तेरा साथ ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त एक तेरा साथ ग्रुपच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून रक्तदान शिबिर, रुग्णांना फळांचे वाटप, गरजूंना कपडे, चादर व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात येते. यावर्षी देखील रक्तदान शिबिरासह शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तर आजच्या रक्तदान शिबिरामध्ये 40 जणांनी रक्तदान केले. यावेळी एक तेरा साथ ग्रुपचे अध्यक्ष अहेमद कुरेशी, उपाध्यक्ष मकबुल टकारी, सचिव अलीम पठाण, जुबेर शेख, नवनाथ डोंगरे, खलील सौदागर, अफजल कुरेशी, रणजीत एडके, जहीर कुरेशी, तनवीर कुरेशी, कृष्णा एडके, रोहित झोंबाडे, इर्शाद शेख, अमजद कुरेशी,  मुजाहिद कुरेशी, मुजाहिद कुरेशी, फेरोज मुजावर, समद शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते. हे रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरिचारिका सुषमा घोडके, रक्तपेढी तंत्रज्ञ दिनकर सुपेकर शिवकुमार जगताप व भारत नागरसोगे यांनी केले. दरम्यान, नागरिकांनी वाढदिवस किंवा महापुरुषांच्या जयंती व इतर कार्यक्रमावर वायफळ खर्च करण्याऐवजी विविध सामाजिक उपक्रम घेण्याबरोबरच रक्तदान शिबिर अवश्य घ्यावे असे आवाहन अध्यक्ष अहेमद कुरेशी यांनी केले आहे.     


 
Top