उमरगा (प्रतिनिधी)-बहुजन विकास संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलें यांचा स्मृतिदिन मंगळवारी (दि 28) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी गुत्तेदार महादेव सोनकांबळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलतांना कमलाकर सुर्यवंशी म्हणाले की,बहुजनांचे उद्धारकर्ते जोतिराव फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत राहून त्यानीं सामाजिक परिवर्तन केले. क्रांतीचे आद्य प्रणेते म्हणून त्याची ओळख असून बहुजन समाजातील गोर गरीब जनतेला शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे काम जोतीराव फुल्यांनी केल्याने आज अनेक अधिकारी घडत आहेत. महिलांना उचित सन्मान मिळवून देण्यासाठी त्यानीं मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीमाई फुलेंना त्यात अध्यापनाचे काम करण्याची संधी दिली आणि वर्णव्यवस्था जुन्या चालीरीतीला ठोकरून सावित्रीमाईंने जोमाने कार्य केले असे मत कमलाकर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

या वेळी शिवशरण माने,सतिष कांबळे, मिलींद कांबळे, धीरज कांबळे, प्रकाश दुणगे, सुनिल वाघमारे,अजीत सरपे,लाला चावीवाले, बाळासाहेब कांबळे, युवराज सोनकांबळे, असीफ लोनी  आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र शाक्यदीप कांबळे यांनी केले फुलचंद कांबळे यांनी आभार मानले.


 
Top