भूम (प्रतिनिधी)-दि. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत तीन दिवसीय अलंमप्रभू व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. तरी या वैचारिक आणि सांगीतिक कार्यक्रमाचा तालुक्यातील रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक कँप्टन अजय मनसुके यांनी केले आहे.
गेल्या 11 वर्षापासून ते सातत्याने व्याख्यानमालेचे आयोजन करीत असून, यंदा हे 12 वर्ष आहे. व्याख्यानमालेचे आयोजन कोर्टासमोरील, नगर पालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दि. 1 डिसेंबर ते 3 डिंसेबर या कालावधीत होत आहे. दि 1 डिसेंबर रोजी “भारताची ज्ञानयुगात झेप “ या विषयावर एम. के. सी.एल. चे मुख्य सल्लागार विवेक सावंत प्रबोधन करतील. दि. 2 डिंसेबर रोजी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, रमाकांत गायकवाड हे अभंगवाणी व सुगमसंगीत सादर करतील. दि 3 डिसेंबर रोजी अर्थक्रांती प्रतिष्ठाणचे प्रणेते अनिल बोकील 'विश्वगुरु भारत - मृगजळ की शक्यता ?' या विषयाला सर्वांगाने प्रबोधन करतील. त्यांची प्रकट मुलाखत प्रा. कल्याण साठे घेतील. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कँप्टन अजय मनसुके यांनी केले आहे.