भूम (प्रतिनिधी)-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना शिबिर आज वांगी (बु) ता. भूम जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या फिरत्या दवाखान्यामध्ये एक्स रे, बीपी, शुगर, कॅन्सर, डोळे तपासणी, गुडघे, याच्या व्यतिरिक्त जो कोणता आजार असेल त्या प्रत्येक आजाराची तज्ञ डॉक्टर कडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे व रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात येणार आहेत.या फिरत्या दवाखान्याचा 223 रुग्णांनी लाभ घेतला असून यावेळी समस्त ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
या फिरता दवाखाना या गाडीचे पूजनशिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, डॉ. फैज खान, डॉ. दिनेश सोनवणे, संतोष मोरे, परवेज सय्यद, के. डी. शिंदे वर्षा भोरे,अतुल माळी, अशोक शेळके, धनाजी गुंजाळ, बजीरंग गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब पाटील, जांबुवंत वाहील, बापू गुंजाळ, जनार्धन लाडे, परमेश्वर शेळके, रामलिंग गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, मधुकर गुंजाळ,चांगदेव माळी, राजेंद्र गुंजाळ, शहाजी गुंजाळ, चंद्रसेन गुंजाळ, अशोक गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, अंकुश भोसले, सचिन लाडे, राहुल माळी, लखन गुंजाळ, समाधान पालके तसेच समस्त ग्रामस्थ व उपस्थित डॉक्टर्स व आशा स्वयंसेविका यांच्या हस्ते करून तपासणीला सुरुवात झाली.