भूम (प्रतिनिधी)-येथील जनविश्वास समुहाच्या वतीने 300 गरजू कुटुंबांना दिपावली निमित्त फराळ वाटप किट देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून.याची सुरुवात आज येथील जनविश्वास कार्यालयातून 100 गरजू नागरिकांना फराळ किट वाटप करून करण्यात आली. सदरील उपक्रम हा समूह मागील दोन वर्षां पासून राबवित असून हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.  या पुढेही हा उपक्रम प्रत्येक वर्षी वाढीव सुरू ठेवण्यात येईल असे यावेळी जनविश्वास समूह संस्थापक अध्यक्ष संतोष सुरेश वीर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आबासाहेब बोराडे,प्रमोद कांबळे,चंद्रमणी गायकवाड,वसीम काजळेकर, अब्बास सय्यद,तानाजी सुपेकर,अजित बागडे,आशिष बाबर,धनंजय शेटे,संदीप बागडे, मुकुंद लगाडे, सोमनाथ टकले,अर्जुन गाडे,मनोज ढगे ,हनुमंत पांढरे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.


 
Top