धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 08.30 ते 09.15 या वेळेमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने भ्रष्टाचाराबाबत जनजागृतीसाठी धाराशिव युनिट कडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये के. टी पाटील फार्मसी कॉलेज व पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिवचे विद्यार्थी यांचा सहभाग होता. 

सदर रॅलीचे उद्घाटन हे पोलीस अधीक्षक धाराशिव अतुल कुलकर्णी यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले आहे. सदरची रॅली ही पोलीस मुख्यालय धाराशिव येथून सुरू होऊन, धाराशिव मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, लहुजी वस्ताद चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, सावरकर चौक मार्गे धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग या मार्गाने येऊन रॅलीचे समारोप करण्यात आले. सदर रॅलीमध्ये धाराशिव युनिटकडील सर्व अधिकारी व कर्मचारी हे सहभागी होते.


 
Top