धाराशिव (प्रतिनिधी)-मध्य रेल, सोलापुर विभागावर, रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक दि. 03 नोव्हेंबर 2023 रोजी समितिचे अध्यक्ष व मंडल रेल प्रबंधक, नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितिच्या, बैठकीच्या सुरवातीस समितिचे सचिव व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एल. के रणयेवले यांनी बैठकीस उपस्थीत सर्व सदस्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्तावीक केले. त्याप्रमाणे सोलापुर विभागातील यात्रा सुखसुविधाबद्दल झालेल्या कामाबाबत आणि चालू कामाबाबत माहिती दिली.
मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या अध्याक्षीय भाषणात समितीच्या सदश्यांचे स्वागत केले. समितीच्या सदस्यांसचे अमुल्य सुझावामुळे प्रवासी व मालवाहतुकी मध्यें सक्रिय सह्योग व सकारात्मक योगदानाच्या माध्यमातुन सोलापुर विभाग प्रगती पथावर पोहचत आहे. आमचे विचार प्रवाशांच्या सुख सुविधा करीत आहेत. त्याच प्रमाणे सोलापुर विभागावर केलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधेच्या संबधी महत्वचपुर्ण कार्याचा उल्लेख केला.“रेल्वे अमृत भारत योजने” मध्ये सोलापूर मंडळातील समावीष्ठ स्टेशन बद्दल माहिती दिली व जे समितिचे सदस्य रेल्वेशी संबंधी सुझाव व समस्या मांडल्या ते पुर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील.
वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक श्री एल. के रणयेवले यांनी समितीच्या सदस्यांना अनुरोध केले की रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या संबंधित विषयावर चर्चा करावी. सोलापुर विभागावरील सदस्यांनी आपआपल्या विभागाशी संबंधित रेल्वे स्टेशन व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरीता महत्वापुर्ण मुद्यावर चर्चा केली जे मुद्दे/समस्यां विभागीय स्तरावरील आहेत त्यांना अग्रक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व जे मुद्दे मुख्यालय स्तरीसय आहेत त्यांना मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.
सदर बैठकीस सर्व सदस्य व सोलापुर रेल्वे विभागाचे अधिकारी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेद्र सिंह परिहार, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितिचे सचिव एल. के रणयेवले, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक श्री. प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल अभियंता( उत्तर) श्री. मोहम्मद फैज, वरिष्ठ मंडल अभियंता( दक्षिण) श्री. बी जगदीश विभागीय सुरक्षा आयुक्त श्री. दिपक कुमार आझाद, सहायक वाणिज्य प्रबंधक श्री. सुदर्शन देशपांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
सदर आयोजित केलेल्या बैठक यशस्वीते बद्दल समितीचे सदस्यांने कौतुक व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितिचे सचिव श्री एल. के रणयेवले यांनी उपस्थित समितिच्या सदस्यांचे व अधिका-यांचे आभार मानले.