धाराशिव (प्रतिनिधी)- येथे श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय , धाराशिव यांच्यावतीने बालदिनानिमित्त बालसप्ताह  व  दत्तक सप्ताह प्रशालेमध्ये विविध उपक्रमासह साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे , विधी पर्यवेक्षिका जयश्री भाले, जयश्री पाटील तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस.बी कोळी, पर्यवेक्षक वाय. के इंगळे, एस.जी. कोरडे, एन.एन. गोरे, श्रीमती बी.बी गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात बालविवाह, बालहक्क, बालकांचे कायदे, अनाथांसाठी असलेल्या योजना, बाल संगोपनासह  1098 या टोल फ्री क्रमांकाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. शेवटी मुलांकडून बाल कल्याण संदर्भात शपथचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार एन. एन. गोरे यांनी मानले.


 
Top