धाराशिव (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेने पंढरपूर कार्तिक यात्रे साठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लातूर - पंढरपूर- लातूर, पंढरपूर - मिरज - मिरज आणी मिरज - कुर्डुवाडी - मिरज दरम्यान 34 अतिरिक्त विशेष आकार शुल्का सहित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे: लातूर- पंढरपूर- लातूर विशेष- 10 फेऱ्या. लातूर- पंढरपूर ( 5- फेरी) विशेष दि.20.11.2023 (सोमवार) रोजी लातूर येथून सकाळी 07:30 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी 12.50 वाजता पोहोचेल.
पंढरपूर - लातूर (5- फेरी) विशेष दि. 20.11.2023 (सोमवार) रोजी पंढरपूर येथून दुपारी 02.30 वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी 07:20 वाजता पोहोचेल. थांबा-हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी जं., मोडलिंब. सुटण्याचे - दिनांक: 20.11.2023, 21.11.2023, 22.11.2024, 24.11.2023 आणि 27.11.2023. संरचना- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -लातूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारा रॅक राहील.
पंढरपूर - मिरज- पंढरपूर विशेष फेरी 8, पंढरपूर - मिरज (4- फेरी) विशेष दि. 20.11.2023 (सोमवार) रोजी पंढरपूर येथून 09.20 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी 12.05 वाजता पोहोचेल. मिरज - कार्तिक (4- फेरी )विशेष दि. 20.11.2023 (सोमवार) रोजी मिरज येथून दुपारी 01.10 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी 05.05 वाजता पोहोचेल. सुटण्याचे दिनांक: 20.11.2023, 21.11.2023, 25.11.2023 आणि 27.11.2023
मिरज- पंढरपूर - मिरज विशेष फेरी 8, मिरज - पंढरपूर (4-फेरी) विशेष दि. 21.11.2023 ( मंगलवार) रोजी मिरज येथून सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी 10.25 वाजता पोहोचेल. पंढरपूर - मिरज (4 - फेरी) विशेष दि. 21.11.2023 (मंगलवार) रोजी पंढरपूर येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी 02.00 वाजता पोहोचेल. थांबा- सांगोला, वासुद, जावळे, मसोब डोंगरगाव, जात रोड, धालगाव, लंगारपेठ, कवठे महाकाळ, सालगरे, बेलंकी आणि अरग. सुटण्याचे दिनांक 21.11.2023 ते 25.11.2023.
मिरज- कुर्डुवाडी - मिरज विशेष फेरी 8, मिरज - कुर्डुवाडी (4- फेरी) विशेष दि. 21.11.2023 ( मंगलवार) रोजी मिरज येथून संध्याकाळी 04.00 वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी रात्री 08.25 वाजता पोहोचेल. कुर्डुवाडी - मिरज(4- फेरी) विशेष दि. 21.11.2023 (मंगलवार) रोजी कुर्डुवाडी येथून रात्री 09.25 वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच रात्री 01.00 वाजता पोहोचेल. थांबे -अरग, बेलंकी, सलगर, कवठे महाकाळ, लंगरपेठ, धालगाव , जथ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळ, वासुद, सांगोला, कार्तिक आणि मोडलिंब. संरचना- 12 डब्बे - एक 10 सामान्य द्वितीय श्रेणीसह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.