उमरगा (संवाददाता)-उमरगा शहरात 10 डिसेबर रोजी सायंकाळी पाच वाजता सकल मराठा समाजाची मोट बांधण्यात यशस्वी झालेल्या जालनाच्या मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. जास्तीत जास्त समाज बांधवानी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

जालनाच्या अंतरावली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सकल मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला आहे. या दरम्यान नव्या दमाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमरगा शहर व तालुक्यातील गावा गावातून याला मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे जरांगे पाटलांना आमंत्रीत करून सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उमरगा तालुका कर्नाटक सीमे लगत असून तालुका व कर्नाटकातील मोठ्या संख्येने महीलासह समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर या जंगी सभेच्या तयारीला सकल मराठा समाज लागला आहे. सभा स्थळाची मंगळवारी (दि 28) सकाळी पाहणी करून सभा मंडप उभारणीचे भूमीपूजन करण्यात आले. सभा यशस्वी करण्याच्या दिशेने सकल मराठा समाज बांधवानी मोठी मोर्चे बांधणी केली आहे.


 
Top