धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. धाराशिव येथे गुरुवारी (दि.19) पत्रकारांच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची विश्लेषणात्मक बातमी केल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या घटनेचा आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवानी निषेध केला.
राज्यातील अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्ले होत असताना सरकारकडूनही पत्रकारांची गळचेपी होत होताना दिसत आहे. भविष्यात पत्रकारांची मुस्कटदाबी करून लेखन स्वातंत्र्यावर सरकारने गदा आणू नये अशी भावना निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
यावेळी धनंजय रणदिवे, संतोष जाधव, चंद्रसेन देशमुख, बाबुराव चव्हाण, हुंकार बनसोडे, उपेंद्र कटके, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी निरफळ, धनंजय पाटील, सुधीर पवार, विनोद बाकले, मच्छिंद्र कदम, रहीम शेख, श्रीराम क्षीरसागर, मल्लिकार्जुन सोनवणे, आकाश नरोटे, काकासाहेब कांबळे, शितल वाघमारे, किरण कांबळे, अजहर शेख, राकेश कुलकर्णी, दीपक जाधव, कुंदन शिंदे, पांडुरंग मते, अजित माळी, अमजद सय्यद, आरिफ मुलाणी, सलीम पठाण, राहुल कोरे, आरिफ शेख, वैभव पारवे, सागर जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटना, वृत्तपत्र व वृत्तवाहिन्याचे पत्रकार उपस्थित होते.