धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्र सरकारने सैन्यामध्ये कंत्राटी अग्निवीर नेमले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही कंत्राटी भरती करण्याचे काम या सरकाने केले. परंतु उपमुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरती योजना सुरू झाली असे सांगतात. आमच्या काळात जर हे सुरू झाले असेल तर कंत्राटी भरती एजन्सी भाजपच्या कशा काय होत्या? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी धाराशिवच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी तुळजापूर येथे जावून तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धाराशिवचे मेडिकल कॉलेज म्हणजे कसलेही सोयीसुविधा नसलेले कॉलेज असून, जिल्हा रूग्णालयात सुध्दा यंत्रणा कुचकामी आहे अशी टिका करून अंबादास दानवे यांनी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाच त्यांच्याच जिल्ह्यात दिव्याखाली अंधार आहे असा टोला लगावला. 

ड्रग माफिया याची नाशिकमध्ये फॅक्टरी असूनही यांची सरकारला माहिती नव्हती. असे सांगून ललित पाटील यास पळून जाण्यास भाग पाडले असे त्यांनी स्वतः सांगितले असल्याचे दानवे यांनी सांगितले. ललित पाटील हे विद्यमान मंत्री दादा भुसे यांच्या जवळचे असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. यावेळी खा. ओमराजेनिंबाळकर यांनी मेडिकल कॉलेजवरून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका केली. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शामलताई वडणे, सोमनाथ गुरव यांच्यासह नेते उपस्थित होते.


 
Top