तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमा दिनी श्रीतुळजाभवानी मंदीरात आकर्षक अशी देशी-विदेशी फुलांचा आरास करण्यात आला होता. देविदर्शन व फुलांचा आरास पाहुन पायी चालत असलेल्या भाविकांना आपल्या श्रमाचा विसर पडत होता. 

राजेशहाजी महाध्दार दारी घाटशिळ येथील श्रीतुळजाभवानी व श्री प्रभुरामचंद्र भेट देखावा फुलातुन साकारला होता. तर मंदिरात पिंपळ कट्यावर  देवि रथात आरुड  होवुन बदक तो रथ ओढत असल्याचा अप्रतिम देखावा साकारला होता. तर मंदिरात देविचे विविध अलंकार रुपे व सिमोलंघन साठी 108 वस्ञासह संरक्षित केलेली देविमुर्ती हा आरास मांडला होता. शेकडो किलो देशी विदेशी फुलांचा यात वापर केला होता.


 
Top