परंडा (प्रतिनिधी)- मराठा  समाजाचे 50% च्या आत कोर्टात टिकणारे ओ बी सी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यासाठी दीर्घकाळ झाले सनदशीर मार्गाने वेगवेगळ्या प्रकाराचे आंदोलनाचे मार्ग अवलंबून सरकारच्या लक्षात आणून  देण्याचा प्रयत्न केला आहे. मनोज जरांगे यांनी यासाठी सरकारला आवश्यक ती सूचना देऊन आमरण उपोषण  केलेले आहे. आज त्यांचे प्राण धोक्यात आलेले आहेत. अनेक मराठा जणांनी टोकाचा आत्महत्येचा मार्ग अवलंबलेला आहे .तरी सुद्धा महाराष्ट्र  सरकार आडमुठे  धोरण ठेवून प्रश्न चिघळत ठेवू पहात आहे. मराठ्यांच्या जीवाशी सरकार खेळत आहे. आता मराठ्यांची सहनशीलता संपत चालली आहे. सरकारला हा प्रश्न मराठ्यांच्या मागणीनुसार सोडवण्यास भाग पाडण्यासाठी आता सकल मराठा समाजाने आमदार, खासदार, मंत्री यांचेही असहकार पुकारावा. जरी आपल्या नातेवाईकांपैकी हे असले तरी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये. त्यांचे शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा. आपल्या कार्यक्रमास त्यांना सहभागी होऊ देवू नये. त्याचे सर्वप्रकारचे कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा. सरकारी फतवे जुमानू नयेत. सरकारला ईमेल करून  हा प्रश्न सोडवण्यात भाग पाडावे, असे भारत घोगरे गुरूजी यांनी म्हटले आहे.


 
Top